संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार

संदीप लांडगे

औरंगाबाद- जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. त्यात जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर चक्क मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह गुजरातमधील विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाल्याचे दिसून येत आहे. बारावीच्या परीक्षेला १८ मार्चपासून सुरुवात झाली आहे.

 कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून दरवर्षी भरारी पथके स्थापन केली आहेत. एकीकडे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत असताना केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांकडून या प्रकाराला खतपाणी घालण्याचा प्रकार सुरु आहे. औरंगाबाद विभागात बारावीच्या परीक्षेदरम्यान आत्तापर्यंत पाच ते सहा मोठे गैरप्रकाराची प्रकरणे समोर आली आहेत. 

त्यामध्ये शिक्षक, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक दोषी आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण सात भरारी पथकाकडून परीक्षा केंद्रावर नजर ठेवण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक पेपरला गैरप्रकाराचे नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. 

सिल्लोड तालुक्यातील एक केंद्रावर भरारी पथकाने तपासणी केली असता तेथे चक्क मुंबई, धुळे, नाशिक, गुजरात येथील वापीचे विद्यार्थी परीक्षेला बसलेले आढळले. त्यांच्या राहाणीमानावरुन भरारी पथकातील अधिकाऱ्यांने विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील अंभईचे असल्याचे सांगीतले. यावेळी अधिकाऱ्यांनी आधार कार्ड दाखवण्यास सांगीतले, तेव्हा त्यात काही परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे मुंबईतील विक्रोळी, नाशिक, धुळे, नागपूर तसेच गुजरात येथील वापीचे आढळले. 

व्हाईट कॉलर, माऊथ कॉपी 
शिक्षण विभागाच्या भरारी पथकाकडून तपासणी करताना वेरुळ येथील एका केंद्रावर चक्क माऊथ कॉपीचा प्रकार सुरु होता. यावेळी परीक्षा कक्षात शिक्षकच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तोंडी उत्तरे सांगत असल्याचा प्रकार सुरु होता. याबाबत भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT